Marathi Shayri and Quotes

स्वप्न पाहावं साकार करण्यासाठी
जगण्याची एक आशा
स्वतःला आजमावण्यासाठी

विश्वावर उन्हं पडताना
चटके घेतो रवी
कवितेत सुंदर वाटणारे सुंदर भाव
काळजात जाळतो कवी

समुद्राच्या लाटा , सोनेरी वाळू, यात्रेकरूंचा विश्वास,
रामेश्वरमचा मंदिर रास्ता, सर्व एकात्म होऊन बनतात माझे आई बाबा ,
वेदनांचे तुम्ही पावित्र आत्मशक्तीत रूपांतर करणारे,
तुमचा सांत्वनाचा स्पर्श, प्रेम, काळजी, विश्वास यांनी
मला शक्ती दिली जगाला निर्भयतेने तोंड देण्यासाठी

ही पृथ्वी देवाची आहे. हे अफाट ,
असीम आकाश त्याचेच आहे .
दोन्ही अमर्याद समुद्र त्याच्याच हृदयात शांत होतात
आणि तरीही लहानश्या टाळ्यातसुद्धा तो आहे.

सूर्य, पृथ्वी आणि ग्रहमालेच्या
मध्यभागी आला तर काय झाले
पृथ्वी किती स्थिर भासते
तीन वेग वेगळ्या गती असूनही